| पावसाचा गट | भारत (प्रदेश) | ब्राझील (प्रदेश) |
|---|---|---|
| जास्त पावसाचे | पश्चिम घाट, पूर्व हिमालय, गोवा, पूर्व महाराष्ट्र | ॲमेझोनास, रिओ ग्राँडे दो सुल |
| मध्यम पावसाचे | पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्र प्रदेश | सांता कॅटरिना, रोराईमा |
| कमी पावसाचे | बिहार, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात | टोकॅटीन्स, पर्नाब्युको, अलाग्वास, पराईबा, रिओ ग्राँडे दो नॉर्ते |
(अ) ब्राझील विषुववृत्तावर स्थित असल्यामुळे त्याच्या हवामानावर मोठा प्रभाव पडतो.
उत्तर : बरोबर
(आ) ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एकाच वेळी समान ऋतू असतात.
उत्तर : चूक
दुरुस्त विधान : ब्राझील व भारत या देशांत एकाच वेळी समान ऋतू असू शकत नाहीत.
(इ) भारतात उष्णकटिबंधीय चक्रीवादळे वारंवार अनुभवास येतात.
उत्तर : बरोबर
(ई) ब्राझीलमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पावसाचे प्रमाण जास्त असते.
उत्तर : चूक
दुरुस्त विधान : ब्राझीलमध्ये आग्नेय व ईशान्य दिशेने वाहणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांमुळे अधिक पर्जन्य पडतो.
भोपाळ (भारत): मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो.
ब्राझीलिया (ब्राझील): सप्टेंबरमध्ये सर्वाधिक उष्णता असते आणि जानेवारीत सर्वाधिक पाऊस पडतो.