६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

१. (अ) दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(१) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ........... यांना मानले जाते.
(अ) संत ज्ञानेश्वर (ब) संत तुकाराम (क) संत नामदेव (ड) संत एकनाथ
उत्तर: महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानले जाते.

(२) बाबूराव पेंटर यांनी ........... हा चित्रपट काढला.
(अ) पुंडलिक (ब) राजा हरिश्चंद्र (क) सैरंध्री (ड) अयोध्येचा राजा
उत्तर: बाबूराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला.

२. टीपा लिहा.

(१) मनोरंजनाची आवश्यकता

(२) दशावतारी नाटके

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

(१) चित्रपटांच्या इतिहासात 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट मैलाचा दगड ठरला.

कारण:

  1. दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये 'राजा हरिश्चंद्र' हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट तयार केला.
  2. या चित्रपटामुळे भारतात चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
  3. चित्रपट निर्मितीतील तांत्रिक प्रक्रिया, दिग्दर्शन आणि छायाचित्रण यांचे भारतीयीकरण फाळके यांनी करून दाखवले.
  4. म्हणूनच हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

(१) पोवाडा म्हणजे काय? त्याचे स्वरूप स्पष्ट करा.

(२) कीर्तनाचे स्वरूप स्पष्ट करा.